पटना (बिहार) - मुजफ्फरपूर जिल्ह्यातील मानिहारी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मालीपूर गावात चोरांनी बँक ऑफ बडोदाच्या गार्डला गोळी मारल्याची घटना घडली. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुजफ्फुर जिल्ह्यात सोमवारी मतदान होणार आहे. तत्पूर्वी अशा प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
निवडणुकीच्या तोंडावरच बिहारमध्ये 'गुंडाराज'; बँकेच्या गार्डला मारली गोळी - गुन्हेगारी
मालीपूर गावात चोरांनी बँक ऑफ बडोदाच्या गार्डला गोळी मारल्याची घटना घडली.
बँक ऑफ बडोदाचे गार्ड मिथिलेश शर्मा आपले काम संपवून घरी निघाले होते. तेव्हा दुचाकीवर आलेल्या ३ गुन्हेगारांनी शर्मा यांना लुटण्याच्या हेतूने त्याच्यावर हल्ला केला. तेव्हा शर्मा यांनी त्याला विरोध केल्याने, गुन्हेगारांनी शर्मा यांच्यावर गोळी झाडली.
या घटनेत शर्मा गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना त्या परिसरातील स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे.