नवी दिल्ली - राज्यातील साऱ्या बड्या नेत्यांना डावलून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च अशा कार्यकारिणीवर संधी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली आहे.
विधानसभा निवडणूक : बाळासाहेब थोरात यांनी घेतली राहुल गांधीची भेट
सोमवारी बाळासाहेब यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा सोपवल्यानंतर काँग्रेसने या पदासाठी बाळासाहेब थोरात यांची निवड केली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीची घोषणा १५ सप्टेंबरच्या आसपास होऊ शकते. या प्रार्श्वभूमीवर निवडणुकांच्या रणनीतीसाठी त्यांनी राहुल गांधीची भेट घेतली असल्याची शक्यता आहे.
प्रदेशाध्यक्षांबरोबरच काँग्रेसने पाच कार्याध्यक्षांचीही निवड केली आहे. यशोमती ठाकूर, नितीन राऊत, बसवराज पाटील, विश्वजीत कदम आणि मुझफ्फर हुसेन यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.