बालाकोट स्ट्राइकचे रणनीतिकार सामंत गोयल ‘RAW’ चे नवे चीफ, अरविंद कुमार 'IB'चे संचालक - arvind kumar
बालाकोट हवाई स्ट्राइकनंतर ३ महिन्यांत तीन महिन्यात गोयल यांची संस्थेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना 'रॉ'मध्ये पाकिस्तानच्या विषयाचे तज्ञ समजले जाते.
सामंत गोयल
नवी दिल्ली - नरेंद्र मोदी सरकारने आज बालाकोट हवाई हल्ल्याच्या प्रमुख रणनीतिकारांपैकी एक सामंत गोयल यांना भारताच्या 'रिसर्च अॅण्ड अॅनालिसिस विंग' (RAW) च्या प्रमुखपदी नियुक्त केले. तर, १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अरविंद कुमार यांना इंटलिजन्स ब्युरोच्या (IB) संचालकपदी नियुक्त करण्यात आले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीद्वारे या नेमणुका करण्यात आल्या आहेत.