महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

रामजन्मभूमी-बाबरी मशीद वाद : सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भोपाळमध्ये कलम 144 लागू - Babri Masjid demolition

देशातील राजकीय आणि सामाजिकष्ट्या अतिशय संवेदनशील महत्त्वपूर्ण अयोध्येतील राम मंदिर प्रकरणी लवकरच निर्णय येणार आहे.

रामजन्मभूमी-बाबरी मशीद वाद

By

Published : Nov 3, 2019, 2:34 PM IST

भोपाळ - देशातील राजकीय आणि सामाजिकष्ट्या अतिशय संवेदनशील महत्त्वपूर्ण अयोध्येतील राम मंदिर प्रकरणी लवकरच निर्णय येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तरुण पिठोडे यांनी भोपाळमध्ये कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.


राम मंदिर-बाबरी मशीद जमीन वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला असून येत्या १७ नोव्हेंबरला निकाल येण्याची शक्यता आहे. कलम 144 लागू झाल्यानंतर भोपाळमध्ये येणारी वाहने पोलिसांकडून तपासली जात आहेत. शहरातील विविध ठिकाणी पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहेत.


कलम १४४ आहे तरी काय?
कलम १४४ हे फौजदारी दंडसंहिता १९७३ मधील कलम आहे. हे कलम अश्या ठिकाणी लागू केले जाते जिथे मोठ्या संख्येने जमाव गोळा झाल्याने कायदा आणि सुव्यवस्था हातात घेतली जाण्याची वा दंगलीची संभावना असेल. हे कलम लागू असणाऱ्या परिसरामध्ये चार किंवा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी असते. जमावबंदीचा आदेश हा जिल्हाधिकारी किंवा जिल्हा न्याय दंडाधिकारी किंवा इतर कार्यकारी दंडाधिकारी देऊ शकतात.

ABOUT THE AUTHOR

...view details