हरिद्वार -कोरोना विषाणूने भारतामध्ये हात-पाय पसरायला सुरवात केली असून भारतामध्ये रुग्णांची संख्या 107 च्या जवळपास पोहचली आहे. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी योगगुरु रामदेव बाबा यांनी देशी रामबाण उपाय सांगितले आहेत. योग आणि आयुर्वेदाद्वारे आपण कोरोनाचा सामना करू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.
'योग अन् आयुर्वेदाद्वारे आपण कोरोनाचा सामना करू शकतो'
कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी योगगुरु रामदेव बाबा यांनी देशी रामबाण उपाय सांगितले आहेत. योग आणि आयुर्वेदाद्वारे आपण कोरोनाचा सामना करू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.
ज्या लोकांमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी आहे. तसेच ज्यांना मधूमेहाची समस्या आहे. अशा लोकांना कोरोना विषाणूची लागण लवकर होते. त्यामुळे कोरोनापासून स्व:ताचा बचाव करण्यासाठी योग करावा. तसेच रामदेव बाबा यांनी घरगुती सॅनिटायझर कसे तयार करावे, याची विधीही सांगितली आहे.
कोरोना साथीचा आजार असल्याने एकमेकांच्या संपर्कात आल्याने पसरू शकतो. नाक, तोंडाला हात लावणेही टाळावे. कारण अस्वच्छ हाताद्वारे कोरोनाचा विषाणू शरिरात प्रवेश करु शकतो. याबरोबरच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आहावन प्रत्येक देशाकडून करण्यात येत आहे. याबाबत आरोग्य विभागांनी नियमावली जारी केली आहे.