नवी दिल्ली- समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान यांनी संसदेच्या तालिका अध्यक्षा रमा देवी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. याप्रकरणात आझम खान यांनी लोकसभेत बोलताना अखेर माफी मागितली आहे.
संसद तालिका अध्यक्षांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आझम खान यांचा अखेर माफीनामा - वादग्रस्त विधान
आझम खान यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. अखेर खान यांनी माफी मागितली आहे.
आझम खान
माझी कुणालाही दुखवण्याची भावना नव्हती. माझे भाषण आणि माझे आचरण कसे आहे याची पूर्ण कल्पना सभेला आहे. तरीही जर माझ्या वक्तव्यामुळे कुणाला वाटत असेल की माझ्याकडून चूक झाली, तर मी माफी मागतो, असे आझम खान म्हणाले आहेत.
संसदेमध्ये आजम खान यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून जोरदार टीका होत होती. त्यांच्या या माफीनाम्यामुळे वादावर पडदा पडेल अशी आशा आहे.
Last Updated : Jul 29, 2019, 12:38 PM IST