अशोकनगर (मध्य प्रदेश) - राज्यात २४ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुका होणार असल्याची चर्चा सुरू आहे. याची कुणकूण लागल्यानंतर सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. दरम्यान, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यानंतर आता ज्योतिरादित्य सिंधियांचा एक ऑडियो व्हायरल होत आहे. हा कथित ऑडियो सिंधिया काँग्रेसमध्ये असतानाचा आहे. या ऑडियोत काँग्रेस नेत्या आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यादरम्यान झालेले संभाषण आहे. यामध्ये पैशांच्या देवाण-घेवाणीबद्दल बातचीत आहे.
पैशांच्या देवाण-घेवाणीबद्दलचा ज्योतिरादित्य सिंधियांचा कथित ऑडियो व्हायरल
बीजेपी नेता ज्योतिरादित्य सिंधिया यांचा २०१८च्या विधानसभा निवडणुकीदरम्यानचा एक ऑडियो व्हायरल होत आहे. या ऑडियोत ते एका महिला नेत्याशी तिकीट आणि पैशाच्या देवाण-घेवाणबद्दल बोलत आहेत.
हा व्हायरल ऑडियो २०१८च्या विधानसभा निवडणुकीदरम्यानचा आहे. काँग्रेस नेत्या अनिता जैन त्यांची सून आशा दोहरे यांना काँग्रेसकडून उमेदवारीसाठी सिंधियांशी बोलत आहे. मात्र, त्यावेळी काँग्रेसने जजपाल सिंह जज्जी यांना उमेदवारी दिली होती. यावर सिंधिया अनिता जैन यांना सांगतात की निवडणुकीनंतर राज्यात आपलेच सरकार येणार आहे. सत्तास्थापनेनंतर आशा दोहरे यांना पक्षात महत्वाच्या पदाची जबाबदारी दिली जाईल. हा ऑडियो निवडणुकीच्या १५ महिन्यांनी पोटनिवडणुका होणार असताना व्हायरल केला गेला आहे. त्यामुळे हा ऑडियो खरा की खोटा आणि तो जाणीवपूर्वक व्हायरल केला गेला असण्याची शक्यता आहे.
ईटीव्ही भारत हा ऑडियो खरा असल्याची खात्री देत नाही.