नवी दिल्ली - दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर हवाई हल्ले करणे म्हणजे युद्ध नाही, तर तसे करणे हा आमचा अधिकारच आहे, असे संरक्षण आणि धोरणात्मक विश्लेषक जे. के. वर्मा यांनी म्हटले आहे. भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
'दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला करणे ही युद्धाची सुरुवात नव्हती तर आमचा अधिकारच'
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात एकही नागरिक ठार झाला नसून कुठलेच लष्करी तळ उद्ध्वस्त केले नाही. दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करणे हा आमचा अधिकार आहे. हे दहशतवादी भारतावर हल्ला करण्याच्या विचारात होते. त्यामुळे हवाई हल्ला करण्यात आला असल्याचेही वर्मा यांनी सांगितले.
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात एकही नागरिक ठार झाला नसून कुठलेच लष्करी तळ उद्ध्वस्त केले नाही. दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करणे हा आमचा अधिकार आहे. हे दहशतवादी भारतावर हल्ला करण्याच्या विचारात होते. त्यामुळे हवाई हल्ला करण्यात आला असल्याचेही वर्मा यांनी सांगितले. भारताने केलेल्या हवाई हल्ल्याकडे स्वसंरक्षणार्थ हल्ला म्हणून पाहावे, असेही वर्मा यांनी नमूद केले. भारत सरकार नियोजनबद्धरित्या ह्या सर्व गोष्टी हाताळत असल्यामुळे वर्मा यांनी भारत सरकारचे अभिनंदन केले.
भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असल्याचे संरक्षणविषयक तज्ज्ञ कमर अघा यांनी म्हटले आहे. पाकिस्तानी लष्कर स्वत:ला इस्लामिक राज्यांचे संरक्षक मानते. पाकिस्तानी लष्कर मोठ-मोठ्या गप्पा करण्यात पटाईत आहे. मात्र, प्रत्येक युद्धामध्ये त्यांना पराभवाचाच सामना करावा लागतो, असे अघा म्हणाले.