काबूल- डाऊनटाऊनमधील चारकाला येथे आज मॅग्नेटिक आईडी स्फोट घडला. या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. एका कारमध्ये हा मॅग्नेटिक आईडी ठेवण्यात आला होता. अशी माहिती काबूल पोलिसांनी दिली.
अफगाणिस्तानमध्ये तालीबान आणि सरकारमध्ये शांतता वार्ता सुरू आहे. असे असताना ही घटना घडून आली आहे. दरम्यान, या वर्षी देशातील नागरी दुर्घटनेची आकडेवारी समोर आली आहे. यूएन मिशन टू अफगाणिस्तानच्या अहवालानुसार (यूएनएएमए) गेल्या ९ महिन्यात देशातील नागरी दुर्घटनेच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्के घट झाली आहे. जरी ही आकडेवारी कमी असली तरी देशातील नागरिकांना झालेली दुखापत ही आश्चर्यजनक असल्याचे अहवालातून सांगण्यात आले आहे.