नवी दिल्ली- लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगातील दोन नंबरचा मोठा देश आहे. पहिल्या क्रमांकावर अर्थातच चीनचा क्रमांक लागतो. मात्र, काल नववर्षदिनी जगामध्ये भारतात सर्वाधिक बालकांचा जन्म झाल्याची नोंद झाली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या 'युनिसेफ' (युनायटेड नेशन चिल्ड्रन फंड) या बालकांसाठी काम करणाऱ्या संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ६७ हजार ३८५ बालकांचा भारतात जन्म झाला आहे.
हेही वाचा -दिल्लीत 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा'; ज्ञानेश्वर मुळेंनी म्हटली कविता
१ जानेवारी २०२० रोजी पहिले बालक 'फिजी' या देशात जन्माला आले आहे. १२.१० मिनिटांनी या बालकाचा जन्म झाला असून ते सुखरूप आहे. १ जानेवारी दिवशी जगभरात एकूण ३ लाख ९२ हजार ७८ बालकांचा जन्म झाला आहे. भारतानंतर चीनमध्ये सर्वाधिक बालकांचा जन्म झाल्याची नोंद झाली असून चीनमध्ये ४६ हजार २९९ मुलांचा जन्म झाला आहे.
हेही वाचा -पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच, तर गंदेरबाल जिल्ह्यात दहशताद्यांच्या हस्तकाला अटक
भारत आणि चीनच्या खालोखाल नायजेरियात २६०३९, पाकिस्तानमध्ये १६७८७, इंडोनिशिया १३०२०, युनायटेड स्टेट अमेरिका १०,४५२, कांगो १०,२४७ आणि इथिओपिया ८४९३ इतक्या बालकांचा जन्म झाला आहे. वर्ष २०१८ मध्ये २ लाख ५० हजार बालकांचा मृत्यू जन्माच्या पहिल्या महिन्यात झाला होता. दिवस भरण्यापूर्वी होणारा जन्म, जन्मावेळी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आणि इन्फेक्शन झाल्याने जास्त बालकांचा मृत्यू झाला.