गुवाहाटी - आसाममधील पूर परिस्थिती मोठ्या प्रमाणात सुधारली आहे. मात्र, या मान्सूनपूर्व पुराच्या तडाख्यात गेल्या आठवड्यापासून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एएसडीएमए) अधिकृत अहवालानुसार, गोलापारा, नागाव आणि होजई जिल्ह्यांतील 253 खेड्यांच्या विस्तीर्ण भाग अद्यापही जलमय आहे.
आसाममध्ये पुरामुळे 3 लाख लोक बाधित, 9 जण ठार - आसाममधील 3 लाख नागरिक पूरग्रस्त
या पुरामुळे आतापर्यंत 2 हजार 678 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर, 44 हजार 331 पाळीव प्राण्यांना याचा फटका बसला आहे. तसेच, कुक्कुटपालन व्यवसायावरही याचा विपरीत परिणाम झाला आहे.
मागील 5 दिवसांत या तीन जिल्ह्यांतील वेगवेगळ्या ठिकाणी 9 जणांचा मृत्यू झाला. अद्यापही दोन लाख लोक या पुरामुळे बाधित आहेत, अशी माहिती एएसडीएमएच्या अधिकाऱ्याने दिली. मान्सूनपूर्व पावसाच्या स्थितीमुळे मागील आठवड्याच्या सुरुवातीपासूनच मुसळधार पाऊस पडत होता. या आठवड्याच्या सुरुवातीला आसाममधील 33 जिल्ह्यांपैकी 11 जिल्ह्यांतील 321 गावांमधील तब्बल तीन लाख लोकांना या पुराच फटका बसला, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
या पुरामुळे आतापर्यंत 2 हजार 678 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर, 44 हजार 331 पाळीव प्राण्यांना याचा फटका बसला आहे. तसेच, कुक्कुटपालन व्यवसायावरही याचा विपरीत परिणाम झाला आहे.