आसाम - आसाममध्ये सध्या पुराने हाहाकार माजला आहे. अशातच, आसाममधील मलोइबरी गाव हे गेल्या सात दिवसांपासून पाण्याखाली आहे. इतक्या दिवसांपासून पाण्याखाली असूनही सरकारकडून मात्र अजून कोणतीही मदत या गावाला मिळाली नाही.
तब्बल 7 दिवसांपासून 'हे' गाव पाण्याखाली; सरकारकडून अजून कोणतीही मदत नाही! - rain
आसाममधील मलोइबरी गाव हे गेल्या सात दिवसांपासून पाण्याखाली आहे. सरकारकडून मात्र अजून कोणतीही मदत या गावाला मिळाली नाहीये.
विशेष म्हणजे, सुमारे दोनशे कुटुंबे राहत असलेले हे गाव आसामची राजधानी गुवाहाटीपासून केवळ 30 किलोमीटर दूर आहे. राजधानीजवळ असलेल्या गावाची जर ही परिस्थिती असेल, तर बाकी गावांची परिस्थिती काय असेल, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, आसाममधील पुरामुळे आतापर्यंत 27 लोकांचा मृत्यू झाला आहे. 57 लाखांपेक्षा जास्त लोकांना या पुराचा फटका बसला आहे. तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे 90 टक्क्यांपेक्षा जास्त पाण्याखाली गेले आहे. जवळपास दीड लाखांपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.