नागरिकत्व दुरुस्ती विधेयक : गुवाहटीत संचारबंदी शिथील, इंटरनेट सेवा बंदच - Curfew relaxed in Guwahati
आसामधील गुवाहटी येथे आज सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत संचारबंदी शिथील करण्यात आली आहे. इंटरनेट आणि संदेश सेवा अद्याप बंद आहे.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक
गुवाहटी -ईशान्य भारतामध्ये नागरिकत्व विधेयकाविरोधात विविध निदर्शने सुरू आहे. आसाम, त्रिपुरामध्ये सैन्य तैनात करण्यात आले आहेत. आज सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत संचारबंदी शिथील करण्यात आली आहे. तर मोबाइल, इंटरनेट आणि संदेश सेवा अद्याप बंदच आहेत.