नवी दिल्ली - आसाममध्ये आलेल्या पुरामुळे राज्यात अनेक ठिकाणी नागरिकांना मोठा फटका बसला आहे. ब्रम्हपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर, काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये पुराचे पाणी जमले आहे. पुरामुळे राज्याचे सौंदर्य नष्ट होत चालले आहे. यामुळे, आसामच्या खासदारांनी आज लोकसभेबाहेरील गांधी पुतळ्यासमोर आंदोलन करताना आसाममधील पुराला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी केली आहे.
आसाममधील पुराला राष्ट्रीय समस्या घोषित करा; आसामच्या खासदारांची मागणी - खासदार
ब्रम्हपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर, काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये पुराचे पाणी जमले आहे. पुरामुळे राज्याचे सौंदर्य नष्ट होत चालले आहे. यामुळे, आसामच्या खासदारांनी आज लोकसभेबाहेरील गांधी पुतळ्यासमोर आंदोलन केले आहे.
संसदेबाहेरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आसाममधील काँग्रेस खासदार विविध पोस्टर्स घेऊन उभे होते. पोस्टर्सवरती आसाममध्ये पुराने प्रभावित झालेल्या लोकांसाठी त्वरित मदत मिळावी, केंद्राने मदत द्यावी, अशी मागणी केली. तर, आसाममधील विद्यमान सरकार पुरस्थितीवर झोपा काढत आहेत, अशी पोस्टर्सही झळकावली.
आसाममध्ये आलेल्या पुरामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. राज्यातील २८ पैकी १८ जिल्हे पुराने प्रभावित झाले आहेत. नागरिकांना घर सोडून बचाव शिबिरांमध्ये राहावे लागत आहे. एनडीआरएफ आणि इतर आपत्ती दल राज्यात विविध ठिकाणी बचावकार्य करत आहेत. आसाम राज्य आपत्ती प्रबंधन प्राधिकरणानुसार, पुरामुळे राज्यात आतापर्यंत ११ लोकांचा मृत्यू झाला आहे.