रांची - झारखंडमधील रांचीत पोलीस सहाय्यक उपनिरीक्षकाची हत्या झाल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला आहे. मृत व्यक्तीची ओळख एएसआय कामेश्वर रविदास अशी झाली आहे. त्याचा मृतदेह तुपुदाना येथे आढळला आहे.
रांचीमध्ये सहाय्यक उपनिरीक्षकाची हत्या - सहाय्यक उपनिरीक्षकाची हत्या
झारखंडमधील रांचीत पोलीस सहाय्यक उपनिरीक्षकाची हत्या झाल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला आहे.
झारखंड
कामेश्वर रविदास यांची मूळ पोस्टींग रांचीच्या रिम हॉस्पिटलमध्ये करण्यात आली होती. त्यांना तुपुदाना ओपी येथे तैनात करण्यात आले होते. माहितीनुसार हत्येनंतर रविदास यांचा मृतदेह टेकडीवरून 200 फूट खाली फेकला गेला. दरम्यान, पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.