महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राजस्थानमध्ये एनआरसी आणि सीएए लागू करणार नाही - अशोक गेहलोत - NRC

राजस्थानमध्ये एनआरसी आणि सीएए लागू करणार नसल्याचे  मुख्यमंत्री  अशोक गेहलोत यांनी  सांगितले आहे.

अशोक गेहलोत
अशोक गेहलोत

By

Published : Dec 22, 2019, 5:57 PM IST

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. राजस्थानमध्ये एनआरसी आणि सीएए लागू करणार नसल्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सांगितले आहे.

देशातील 9 राज्यांनी एनआरसी आणि सीएए लागू करणार नसल्याचे सांगितले आहे. तुमचे बिहार आणि ओडिशामधल्या युतीच्या सरकारने तुम्हाला संसदेमध्ये पाठिंबा दिला. मात्र आपल्या राज्यात एनआरसी आणि सीएएचा विरोध केला आहे. तुम्ही लोकांच्या भावना समजून घ्या आणि एनआरसी-सीएए लागू करणार नसल्याचे जाहीर करा, असे गेहलोत यांनी म्हटले आहे. हेही वाचा -'खुर्ची'साठी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचे विमानात धरणे आंदोलन

देशभरामधून नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीचा विरोध होत आहे. बऱ्याच ठिकाणी हिंसक आंदोलन पहायला मिळाले. आंदोलनांमध्ये आतापर्यंत उत्तर प्रदेशमधील १५ जणांचा, तर कर्नाटकमधील दोघांचा जीव गेला आहे.या पार्श्वभूमीवर, देशभरात ठिकठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली होती.

हेही वाचा -दिशा प्रकरण: एम्समधील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक शवविच्छेदन करण्यासाठी हैदराबादला रवाना

ABOUT THE AUTHOR

...view details