महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शेवटच्या श्वासापर्यंत मी देशासाठी काम करणार - अरविंद केजरीवाल - education

मी शेवटच्या श्वासापर्यंत देशासाठी काम करत राहणार आहे. भाजप मला मारण्याचा प्रयत्न का करत आहे? असे म्हणत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला.

अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा

By

Published : May 19, 2019, 12:45 PM IST

नवी दिल्ली - माझा गुन्हा काय आहे? भाजप मला मारण्याचा प्रयत्न का करत आहे? असा प्रश्न उपस्थित करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच शेवटच्या श्वासापर्यंत मी देशासाठी काम करत राहणार असल्याचेही केजरीवाल म्हणाले.

प्रथमच देशात शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात दिल्लीमध्ये चांगले काम होत आहे. मात्र, भाजप सरकार या चांगल्या कामावर राजकारण करत आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत देशासाठी काम करत राहणार असल्याचे केजरीवाल म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details