नवी दिल्ली -गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली सरकारवर हल्ला चढविल्याने दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. अमित शाह यांनी आपल्या संपूर्ण भाषणामध्ये मला शिव्या दिल्या. जर त्यांच्याकडे विकास करण्यासाठी काही कल्पना असतील त्यांनी सांगाव्यात. त्या आम्ही पुढील पाच वर्षांमध्ये लागू करू, असा टोला केजरीवाल यांनी शाह यांना लगावला.
गृहमंत्र्यांनी भाषणातून मला फक्त शिव्याच दिल्या, केजरीवालांचा पलटवार - amit shah attacks kejriwal
गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली सरकारवर हल्ला चढविल्याने दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.
मी आज गृहमंत्री अमित शाह यांचे संपूर्ण भाषण ऐकले. मला वाटले होते, की ते आम्हाला कामांमधील उणीवा दाखवतील आणि आणखी विकास कसा करता येईल, यावर भाष्य करतील. मात्र, ते मला शिव्या देण्याशिवाय दुसरे काहीच बोलले नाही. दिल्लीच्या विकासासाठी त्यांच्याकडे काही सूचना असतील, तर त्यांनी सांगाव्यात. त्यातील चांगल्या सूचना आम्ही येत्या 5 वर्षांत लागू करू, असे केजरीवाल यांनी टि्वट केले.
दरम्यान गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी दिल्लीमध्ये नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ सभा घेतली. यावेळी त्यांनी दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडले. गेल्या 5 वर्षांमध्ये केजरीवाल सरकारने काहीच काम केलं नसल्याचे शाह म्हणाले. केजरीवाल यांनी १५ लाख सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे वचन दिले होते. तसेच ५ हजारहून जास्त शाळा बांधण्याबद्दलचे आश्वासन दिले होते. मी चष्मा लावून पाहतोय पण मला कुठे शाळा दिसत नाहीत, असा टोला शाह यांनी लगावला. केजरीवाल यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये किती काम केले. याचा हिशोब जनतेने त्यांना मागावा, अशी टीकाही शाह यांनी केली.