'जर भाजपने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला नाही, तर लोकांची मते खड्ड्यात' - दिल्ली विधानसभा मतदान
मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारासोबत आम्ही वादविवाद करण्यास तयार आहोत. जर भाजपने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला नाही, तर लोकांची मते खड्ड्यात जाणार, असे केजरीवाल म्हणाले
संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि आम आदमी पक्षामध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा, असे आव्हान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपला केले आहे, यावर केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिले आहे.