नवी दिल्ली- प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव माजी अर्थमंत्री अरुण जेटली दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांकडून मिळत आहे. श्वासोश्वास घेण्यास त्रास होत असल्याने अरुण जेटली यांना शुक्रवारी रुग्णायलात दाखल करण्यात आले होते. जेटली यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून जेटली आरोग्यासंबंधीच्या व्याधींनी त्रस्त आहेत.
माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती स्थिर, एम्समध्ये सुरू आहेत उपचार - arun jaitly in hospital
प्रकृतीच्या कारणास्तव माजी अर्थमंत्री अरुण जेटली दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील सुत्रांकडून मिळत आहे.
अरुण जेटली
उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांनी शनिवारी एम्स रुग्णालयात जाऊन जेटलींच्या तब्यतेची विचारपूस केली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही शुक्रवारी रुग्णालयात जाऊन जेटलींची भेट घेतली होती.