महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मला माझ्या घरात नजरकैदेत ठेवले आहे - फारुख अब्दुल्ला

कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयानंतर अब्दुल्ला यांनी टीका केली आहे. सरकारने बळाचा वापर करून काश्मीरमधल्या नेत्यांना अटक केली. आम्हाला नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी सांगितले.

मला माझ्या घरात नजरकैदेत ठेवले आहे - फारुख अब्दुल्ला

By

Published : Aug 6, 2019, 6:13 PM IST

जम्मु-काश्मीर - जम्मू आणि काश्मीरमध्ये लोकशाही नव्हे तर हुकुमशाही चालविली जात आहे. असे सांगून आम्हाला नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी सांगितले. भावनिक उद्रेकात यांनी फारुख अब्दुल्ला यांनी माध्यमांशी बोलण्यासाठी दरवाजा तोडला आहे.

आम्ही ग्रेनेड फेकणारे किंवा दगडफेक करणारे नाही. आम्ही शांततेच्या मार्गाने आमची लढाई लढत आहोत. कलम ३७० वरून सरकार जनतेची दिशाभूल करते आहे. कलम ३७० संविधानाला धरुन नाही, या निर्णयाला आम्ही आव्हान देऊ असेही अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. माझ्या घरात मला नजरकैद करून ठेवण्यात आले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

सरकारने बळाचा वापर करुन काश्मीरमधल्या नेत्यांना अटक केली आहे. माझे राज्य जळत असताना मी माझ्या घरात माझ्या मर्जीने कशाला राहिन? असा प्रश्नही अब्दुल्ला यांनी विचारला आहे. ज्या भारतावर माझा विश्वास आहे तो हा भारत नाही असंही अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details