महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Article 370: 'भारत इस्लामपेक्षाही प्राचीन;' मुस्लीम तत्त्वज्ञ तौहिदींनी पाकचे उपटले कान - झाकिर नाईक

'काश्मीर आणि पाकिस्तान हे दोन्हीही भारताचेच भाग आहेत. येथील मुस्लीम हे हिंदू धर्मीयांनी धर्मांतर केल्यामुळे मुस्लीम बनलेले आहेत. मात्र, असे केल्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही. हा संपूर्ण प्रदेश हिंदूंचाच भूभाग आहे. भारत हा पाकिस्तानचा जन्म होण्याआधीपासून अस्तित्वात आहे. तसेच, तो इस्लाम धर्मापेक्षाही अधिक प्राचीन आहे, हे प्रामाणिकपणे मान्य करावेच लागेल,' असे तौहिदींनी म्हटले आहे.

मुस्लीम तत्त्वज्ञ इमाम मोहम्मद तौहिदी

By

Published : Aug 13, 2019, 11:03 AM IST

नवी दिल्ली -'काश्मीर पाकिस्तानचा भाग कधीही नव्हता आणि कधीही होणार नाही. उलट, काश्मीर आणि पाकिस्तानही भारताचे भाग आहेत, हे प्रामाणिकपणे मान्य करायला हवे,' असे खडे बोल खुद्द एका इस्लामी धर्मगुरुंनीच पाकिस्तानला सुनावले आहेत. अमेरिकेतील मुस्लीम तत्त्वज्ञ इमाम मोहम्मद तौहिदी यांनी भारताने आर्टिकल 370 रद्द करण्याच्या प्रकरणाबद्दल मत व्यक्त करताना हे ट्विट केले आहे. यामुळे पाकला चांगलीच चपराक बसली आहे.

'काश्मीर आणि पाकिस्तान हे दोन्हीही भारताचेच भाग आहेत. येथील मुस्लीम हे हिंदू धर्मीयांनी धर्मांतर केल्यामुळे मुस्लीम बनलेले आहेत. मात्र, असे केल्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही. हा संपूर्ण प्रदेश हिंदूंचाच भूभाग आहे. भारत हा पाकिस्तानचा जन्म होण्याआधीपासून अस्तित्वात आहे. तसेच, तो इस्लाम धर्मापेक्षाही अधिक प्राचीन आहे, हे प्रामाणिकपणे मान्य करावेच लागेल,' असे म्हणत इस्लामी तत्त्वज्ञ तौहिदी यांनी पाकला घरचा आहेर दिला आहे. आर्टिकल ३७० वरून आगडोंब उसळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानचा तौवहिदी यांच्या ट्विटमुळे नक्शा उतरवला गेला आहे.

तौहिदी यांनी वादग्रस्त मुस्लीम धर्मगुरु झाकिर नाईकलाही फटकारलेभारतातून पळालेला वादग्रस्त मुस्लीम धर्मगुरु झाकिर नाईक याने मलेशियातील हिंदू मलेशियन पंतप्रधानांशी प्रामाणिक नसून ते भारतीय पंतप्रधानांशी प्रामाणिक असल्याचे वक्तव्य केले होते. नुकत्याच केलेल्या ट्विटमधून तौहिदी यांनी झाकिर नाईकचाही चांगलाच समाचार घेतला आहे. 'बिन लादेनचा फॅन असलेल्या झाकिर नाईकचे हे वक्तव्य परिस्थितीच्या अगदी उलटे आहे. प्रत्यक्षात पाश्चिमात्य देशांमधील मुस्लीम अयातुल्लाह आणि मुफ्तींनी काढलेल्या फतव्यांचा स्वतःच्या दैनंदिन जीवनात अवलंब करतात. शिवाय, त्यांना पैसाही पुरवतात,' असे ट्विट तौहिदी यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details