नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. डी. के. शिवकुमार यांना अटक करणे हे सूडबुद्धीचे राजकारण आहे, असे राहुल गांधी यांनी टि्वट करून म्हटले आहे. तसेच, सरकारईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल, म्हणाले... 'शिवकुमार हे सूडबुद्धीच्या राजकारणाचं आणखी एक उदाहरण' - 'ईडी आणि सीबीआय
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा-कर्नाटकमधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते डी. के शिवकुमार यांना ईडीकडून अटक
कर्नाटकमधील काँग्रेस नेते डी. के शिवकुमार यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्लीतून अटक मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्या (पीएमएलए) अंतर्गत अटक करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांनी अटक केलेले शिवकुमार हे दुसरे काँग्रेस नेते आहेत.
न्यायालयाने शिवकुमार यांना 13 सप्टेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवले आहे. शिवकुमार यांना अटक केल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी कर्नाटकात बंद पुकारला आहे.