जयपूर - राजस्थानमधील नयनरम्य अशा सांभर सरोवर आणि आसपासच्या प्रदेशात १२ तारखेपासून (मंगळवार) हजारो पक्षांचा मृत्यू होत आहे. जिल्हा प्रशासनाने पक्षांचा जीव वाचवण्यासाठी बचावकार्य हाती घेतले आहे. मृत पक्षांना लागलेले किडे इतर पक्षांनी खाल्ल्यामुळे हजारो पक्षांचा मृत्यू झाल्याचे तपासात पुढे आले आहे. या मृत किड्यांना 'मैगैटस' असे म्हटले जाते. आत्तापर्यंत २ हजार देशी तसेच परदेशी पक्षांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
राजस्थान : सांभर सरोवरात तब्बल २ हजार देशी-विदेशी पक्षांचा मृत्यू - सांभर सरोवर पक्षी
राजस्थानमधील नयनरम्य अशा सांभर सरोवर आणि आसपासच्या प्रदेशात १२ तारखेपासून (मंगळवार) हजारो पक्षांचा मृत्यू होत आहे. जिल्हा प्रशासनाने पक्षांचा जीव वाचवण्यासाठी बचावकार्य हाती घेतले आहे.
याप्रकरणी तत्काळ चौकशीचे आदेश जिल्हाधिकारी अशोक गेहलोत यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी दजरुप सिंह यांच्या निगराणीखाली बचाव कार्य सुरु आहे. १० तारखेपासून पक्षांचा मृत्यू होण्यास सुरुवात झाली आहे. पक्षांच्या मृत्यू मागील कारणांचा शोध लावून पुन्हा अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी पक्षी तज्ज्ञही पुढे सरसावले आहेत. ५ बचाव पथके सरोवरामधून मृत पक्षी बाहेर काढण्याच्या कामात व्यस्त आहेत. याकामी पशुपालन आणि वन विभागाचे अधिकारीही चौकशी करत आहेत. आत्तापर्यंत १ हजार पक्षांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली आहे. गरज पडल्यास बचाव कार्य करणाऱया पथकांची संख्या वाढवण्यात येईल असे प्रशासनाने सांगितले आहे.