बाडमेर -राजस्थानातील बाडमेर जिल्ह्यात शनिवारी सकाळी बीएसएफ जवानांना घेऊन जाणारा ट्रक आणि एका खासगी बसदरम्यान जोरदार धडक झाली. यामध्ये 9 बीएसएफ जवानांसह 12 जण जखमी झाले. जखमींना बाडमेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, दोन गंभीररीत्या जखमींना जोधपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. यापैकी एकाची प्रकृती अधिक गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.
शनिवारी सकाळी अहमदाबादहून बाडमेरमार्गे जैसलमेरला जाणारी खासगी बस आणि बीएसएफचा ट्रक यांच्यात शहरातील तिलकनगरजवळ जोरदार धडक झाली. यात एकूण 12 जण जखमी झाले. यात बीएसएफच्या ९ जवानांचा समावेश आहे.