नवी दिल्ली- देशातील कोरोनाचा प्रसार पाहता, खबरदारीचा उपाय म्हणून लष्कराने सर्व लष्करभरती एक महिन्याने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, लष्कराने आपल्या जवानांना केवळ अत्यावश्यक कामासाठीच प्रवास करण्याचे आदेश दिले आहेत.
जिथे जिथे शक्य आहे, तिथे प्रत्यक्ष भेटण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला प्राधान्य द्यावे, असेही लष्कराने अधिकाऱ्यांना सुचवले आहे. तसेच, विविध ठिकाणच्या मुख्यालयांना आवश्यक ती वैद्यकीय सुविधा तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.