जम्मू काश्मीर - राज्याचे महासंचालक दिलबाग सिंह आणि लष्कराच्या चिनार कॉर्पसचे लेफ्टनंट जनरल के. जे. एस धिल्लोन यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. काश्मीरमधील दहशतवादात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असून पाकिस्तान कश्मीरमधील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांच्या प्रयत्नांना आम्ही यश मिळू देणार नाही, असे लेफ्टनंट जनरल के. जे. एस धिल्लोन म्हणाले.
कश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढणार असल्याची गुप्तचर यंत्रनाकडून माहिती मिळाली आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये सैन्य वाढवण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून खोऱ्यात दहशतवाद विरोधी कारवाया सुरु आहेत, त्यामुळे सैनिकांना आराम मिळत नाही, असे राज्याचे महासंचालक दिलबाग सिंह म्हणाले.
दरम्यान अमेरीकन बनावटीची एम- २४ रायफल अमरनाथ मार्गावरुन जप्त करण्यात आल्याची माहिती धिल्लोन यांनी दिली. तर लष्काराला शोधमोहिमेमध्ये एक भुसुरुंग सापडला असून तो पाकिस्तानातील फॅक्टरीत तयार करण्यात आल्याचं त्यांनी सांगतिले.
अमरनाथ यात्रा स्थगित : यात्रेवर दहशतवादाचे सावट, यात्रेकरूंना परतण्याच्या सूचना
तुमचा मुलगा आज दगडफेक करत असेल तर तो उद्या दहशतवादी बनेल, हींसक कारवायांपासून मुलांना परावृत्त करण्याचे आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी काश्मीरमधील पालकांना केले.
या वर्षात दहशतवाद्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी १० गंभीर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मुन्ना लाहोरी, कामरान, उस्मान यांसारखे दहशतवाद्यांना पकडण्यात आले, असे पोलीस महा निरिक्षक एस. पी पानी यांनी सांगितले.