बांका -देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना प्रशासनाकडून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. कलाविश्वातील कलाकार देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन करत आहेत. आता एका विदेशी महिलेने देखील एका खास शैलीत व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांनी चांगली पसंती दिली आहे.
भारतीय कुटुंबाच्या विदेशी सुनेने व्हिडिओतून दिला खास संदेश, पाहा व्हिडिओ
तनिका असे या महिलेचे नाव आहे. तिने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना प्रशासनाचे नियम पाळण्याचा संदेश आपल्या व्हिडिओतून दिला आहे.

10 वर्षापूर्वी तनिका फोसो हिचे लग्न बाराहाटच्या गोडधोवा गावातील रहिवासी मुकेश योगी याच्याशी झाले होते. त्यामुळे तिने आपल्या कुटुंबीयांना देखील घराबाहेर पडू नका, असे सांगितले आहे. तिला सेक्साफोन वाजवण्याचाही छंद आहे.