भुवनेश्वर : वैद्यकीय पूर्वपरीक्षा 'नीट'मध्ये नापास होण्याच्या भीतीने एका १८ वर्षांच्या मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ओडिशाच्या मयुरभंज जिल्ह्यात ही घटना घडली. उपासना साहू असे या मुलीचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री तिच्या पालकांना तिने आत्महत्या केल्याचे समजले. त्यानंतर तातडीने तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. बद्रिपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक बी. सेनापती यांनी याबाबत माहिती दिली.