अमरावती - शत्रू देश पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली आंध्रप्रदेश पोलिसांनी ७ नौदलाच्या कर्मचाऱ्यांना शुक्रवारी अटक केली आहे. हे सर्वजण पाकिस्तानला भारतातील लष्करासंबधीची गुप्त माहिती देत असल्याच्या संशयाखाली पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा -breaking news : जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी चार दोषींना फाशीची शिक्षा
केंद्रीय अन्वेषण विभाग आणि नौदल अन्वेषण विभागाने संयुक्त कारवाई करत या ७ जणांना अटक केली. यासाठी पोलिसांच्या पथकाने 'डॉल्फीन नोज' हे ऑपरेशन राबवत ७ जणांच्या मुसक्या आवळल्या.
हेही वाचा -पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली उत्तरप्रदेशातून एकाला अटक
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी देशातील इतर ठिकाणांवरूनही हवाला ऑपरेटरला अटक केली आहे. याप्रकरणी आणखी संशयिताची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्वांना न्यायालयात हजर केल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.