लखनऊ- बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी आपला सख्खा भाऊ आनंद कुमार यांना पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष केले आहे. तर, आनंद यांचा मुलगा आकाश याला राष्ट्रीय कोऑर्डिनेटर केले आहे. पक्षाची महत्वाची पदे आता मायावती यांच्या कुटुंबातच देण्यात आली आहे. दरम्यान, या निर्णयामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला याचा फायदा होईल, असे बैठकीनंतर बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
घराणेशाहीच्या वाटेवर बसपा; मायावतींनी सख्खा भाऊ अन् भाच्याला दिली महत्वाची पदे - akash
या निर्णयामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला याचा फायदा होईल, असे बैठकीनंतर बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
बहुजन समाज पक्षाची रविवारी महत्वाची बैठक पार पडली. यावेळी हे निर्णय घेण्यात आले आहेत. बहुजन समाज पक्षाची स्थापना कांशीराम यांनी एका मिशनमधून केली होती. यासाठी ज्या लोकांवनी स्वतःला समर्पित केले, त्यांना याचा फायदा व्हावा, अशीच त्यांची इच्छा होती. त्यामुळेच या बैठकींना मिशन बैठक म्हटले जाते.
ही बैठक बसपासाठी महत्वाची होती. कारण यामध्ये पक्षातील २ उच्च पदे देण्यात आली होती. याच पदांवरून पक्षावर घराणेशाहीचा आरोप केला जात होता. झालेही तसेच, पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी पक्षाचे उपाध्यक्ष आपला सख्खा भाऊ आणि राष्ट्रीय कोऑर्डिनेटर म्हणून भावाचा मुलगा आकाश, यांच्या नावाची घोषणा केली.