कोलकाता - एका व्यक्तीला बिबट्याचे छायाचित्र घेणे चांगलेच महागात पडले आहे. छायाचित्र घेताना बिबट्याने हल्ला केला असून यामध्ये त्या व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे.
छायाचित्र घेताना बिबट्याने केला हल्ला, पाहा चित्तथरारक व्हिडिओ - छायाचित्र
एका व्यक्तीला बिबट्याचे छायाचित्र घेणे चांगलेच महागात पडले आहे. बिबट्याने हल्ला केला असून यामध्ये त्या व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे.
छायाचित्र घेताना बिबट्याने केला हल्ला
एक बिबट्या रसत्याच्या कडेला जखमी अवस्थेमध्ये पडला होता. यावेळी त्याला पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. काही जण आपल्या मोबाईलमध्ये छायाचित्र घेत होते. यावेळी शांत पडलेल्या बिबट्याने अचानक एका व्यक्तीवर हल्ला चढवला. जीव मुठीत धरून त्याने बिबट्याशी झटापट करून हल्ला परतवला.
दरम्यान बिबट्याला उपचारासाठी नेण्यात आले असून तो बरा झाल्यावर त्याला जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.