कोरोना महामारीने शीतयुद्ध पुकारले आहे आणि संपूर्ण जगाला त्सुनामीसारखे गिळून टाकले आहे. अमेरिकेतही त्याचा वेगाने प्रसार होत आहे.अध्यक्ष ट्रम्प यांना डॉक्टरांनी लॉकडाऊनचा सल्ला दिला आहे. मात्र, ट्रम्प पूर्ण प्रमाणात लॉकडाऊन करण्याच्या विरोधात आहेत. कारण, त्यामुळे निर्माण होणाऱया तीव्र आर्थिक संकटाला सामोरे जाणे अवघड होईल, असे त्यांचे मत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, मात्र, ३ आठवड्यांसाठी राष्ट्रव्यापी लॉकडाऊन जाहीर केला असून लोकांची सुरक्षा आणि जिवाला प्राधान्य दिले आहे.
कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. यावरून हे स्पष्ट होते की, पहिले एक लाख पॉझिटिव्ह रूग्ण आढळण्यासाठी ६७ दिवस लागले तर, पुढील एक लाखांची भर पडण्यासाठी फक्त ११ दिवस घेतले. तर अवघ्या ४ दिवसांत आणखी एक लाख रुग्णांची भर पडली, कोरोनाचा प्रसार वेगाने होत असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.
भारतात पहिले ५० कोरोनाचे रुग्ण सापडण्यासाठी ४० दिवस लागले. तर आणखी ५ दिवसांत ५० ची त्यात भर पडली. ५ दिवसांत भारतात कोरोना रूग्णांची संख्या दुप्पट झाली हा महामारीच्या वेगाने प्रसाराचा आगाऊ संकेत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशभर जाहीर केलेली लॉकडाऊनची घोषणा हे ठोस धोरण आहे. कोरोना विषाणूची लक्षणे ही संसर्ग झाल्यापासून १४ दिवसांच्या आत प्रकट होतात. आजार कुटुंबातच बंदिस्त राहात असल्याने, रूग्ण ओळखून त्यांच्यावर अचूक उपचार करणे शक्य होते. त्याचवेळेस, समाजातील अन्य लोकांना त्याची शिकार होण्यापासून रोखता येते.
देवी आणि पोलिओ ज्यांनी पूर्वी जगाला पोखरले होते, यांचे नामोनिशाण मिटवण्यात भरातला यश आले होते. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूएचओ) कोरोना महामारीच्या विरोधात लढ्याचे नेतृत्व भारताने करावे, असे वाटते. केंद्र आणि राज्य सरकारने आखलेल्या धोरणांप्रती लोकांनी कटिबद्घ असले पाहिजे. कारण, महामारीविरोधात सरकार वेळेशी स्पर्धा करत असून देशाला यातून विजयी होत बाहेर काढण्यासाठी मदत करत आहे.
केंद्र सरकारने केलेल्या नाकाबंदीच्या अंमलबजावणीमुळे होणारे वित्तीय नुकसान ९ लाख कोटी रूपयांचे असल्याचा अंदाज आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन मंड़ळाची आकडेवारी वित्तीय नुकसानापेक्षा मानवी जीव वाचवण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनच्या महत्वाला पुष्टी देते. आयसीएमआरने असे जाहीर केले की, या महिन्याच्या १५ तारखेपर्यंत केवळ १०० रूग्ण निश्चित केले होते, पुढील १५ दिवसांत त्यांच्या ९ पटींनी संख्या वाढली. केवळ सर्व कुटुंबांना घरातच मर्यादित ठेवले तर कोरोना केसेसची तीव्रता ६९ टक्क्यांनी कमी करता येते. यामुळे रूग्णांच्या संख्येत अचानक हजारोंनी वाढ होण्याचा धोकाही टाळला जाईल आणि आरोग्य क्षेत्रावर अनावश्यक ताण येणार नाही. लक्षणांशिवाय ७५ टक्के पॉझिटिव्ह केसेस आपण शोधू शकलो तर, त्याचा उद्रेक साथीमध्ये होण्यापासून नियंत्रण करता येते. दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्या अनुभवांनी हे दाखवून दिले आहे.