अनेक उपाय करूनही, हैदराबाद आणि वरंगळमधील बलात्कार आणि खुनाच्या घटना या महिलांवर अशा मानवाच्या रुपातील जनावरांकडून सातत्याने सुरू असलेल्या अखंडित अत्याचारांची उदाहरणे आहेत. दीर्घकालापासून बलात्काराच्या घटनांवर जगभरात सुरू आहेत. संशोधन अभ्यासावरून बलात्काऱ्याचा शेडीझम, क्रौर्य आणि मानसिक अवस्था यावर विश्लेषकांनी प्रकाश टाकला आहे.
विचारवंत काय म्हणतात?
बलात्कार हा महिलेवर शुद्धीवर असलेल्या पुरूषाने तिला धमकावून केलेला लैंगिक हल्ला आहे. या वाईट कृत्यासाठी महिलेला दोष देण्यात काही अर्थ नाही.
आत्यंतिक क्रौर्य, अतिशय उत्तेजना किंवा भावनात्मक हल्ला करताना स्वतःला श्रेष्ठ समजण्याची मानसिकता असे बलात्काऱ्यांचे तीन स्वभाव असतात, असे स्त्रीवादी लेखिका सुशान ब्राऊन मिलर यांनी अगेन्स्ट विल या १९७५ च्या पुस्तकात म्हटले आहे.
संपूर्ण स्थिर मानसिकता असलेल्या पुरुषाकडून बलात्कार केले जात नाहीत. ते नेहमीच मानसिक स्थैर्याचा अंशतः किंवा संपूर्ण अभाव असलेल्या पुरुषांकडून केले जातात.
महिला, एकटी मुलगी किंवा मुले अशा असहाय्य व्यक्तींनाच बलात्कारी लक्ष्य करत असतात. लहान मुलांवर बलात्कार होतात कारण त्यांना ते माहीत नसते, बलात्काराच्या कृत्याला ते ओळखू शकत नाहीत किंवा चॉकलेट किंवा खेळणी दिल्यावर ते विरोध करू शकत नाहीत. टीव्हीवरील किंवा वर्तमानपत्र आणि समाजमाध्यमांवर संबंधित बातमी पाहून ते काळजी घेतात, असे निकोलस ग्रोथ यांनी ''मेन हु रेप-१९७६' या पुस्तकामध्ये म्हटले आहे.
बलात्कारी व्यक्ती सामान्य व्यक्ती म्हणून जगत असताना कधीही आपल्या भावनांचे प्रदर्शन करत नाहीत. ते केव्हा बलात्कार आणि हल्ला करण्यास उद्युक्त होतील, हे आपण सांगू शकत नाही. कारण ते मानसिकदृष्ट्या स्थिर नसतात, असे जॉर्जटाऊन विद्यापीठातील फोरेन्सिक मानसोपचार तज्ञ रॉबर्ट सायमन यांचे मत आहे.
बलात्कारी व्यक्तीकडे दयाळूपणा, सहानुभूती अशा स्वभावगुणांचा अभाव असतो आणि सामान्य माणूस म्हणून ते अशा कृत्यांकडे अमानवी आणि क्रूर कृत्य म्हणून पाहत नाहीत.
केवळ वासना नव्हे...
अभ्यासातून असे उघड झाले आहे की, ६० ते ७० टक्के बलात्काराच्या घटना या केवळ वासनेतून होत नाहीत. बलात्कारी असहाय्य महिला किंवा मुलींना पूर्णपणे ताब्यात ठेवू पाहतात, आपले वर्चस्व दाखवू पाहतात आणि लैंगिक अत्याचार करतात. शत्रुला प्रत्युत्तर देताना, अशा व्यक्ती मुलांना पळवतात, त्याच्या पत्नीवर बलात्कार करतात आणि इतर अत्याचार करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.
समाजशास्त्रज्ञ या कृत्यांचा अधिक लैंगिक स्वातंत्र्य आणि महिलांवरील श्रेष्ठत्व यांच्याशी संबंध लावतात. एखाद्याने काही लोकांकडून बलात्कार होत असताना पाहिले तर तोही इतरांच्या पाठिंब्याने लैंगिक अत्याचार करण्यास सरसावतो.
त्यांना काय वाटते?
क्लिनिकल मानसोपचार तज्ञ डॉ. रजत मिश्रा यांना तुरुंगातील बलात्काऱ्यांशी बोलल्यावर असे आढळले की, त्यांची मुक्त होण्याची अतिशय तीव्र इच्छा आहे. ९० टक्के बलात्कार परिचित लोकांकडूनच होतात, पण २५ टक्के महिला आणि मुली बलात्काराचे प्रसंग उघड करायला धजत नाहीत, कारण इतरांचा त्यांच्यावर विश्वास नसतो.
आखलेल्या योजनेनुसार बलात्कार केले जातात आणि शिकार झालेल्या महिला आणि मुलींना केवळ जखमांवर उपचारच नव्हे तर मानसिक उपचारांचीही गरज असते. बलात्कारी हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि त्यामध्ये न्यूनगंड असलेले जे वर्चस्व गाजवून हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा समावेश आहे.
काही जण संताप व्यक्त करतात, शारिरीक, भावनिक छळ करतात आणि शोषण करताना वेदना देऊन आनंद प्राप्त करतात. काही जण तिरस्कार करतात, गलिच्छ भाषा वापरून अपमान करतात, तुच्छ समजतात. त्यांचे वर्तन संताप आणि संधीसाधूपणाबरोबरच अतिक्रौर्याचे असते.
मानसोपचापर तज्ञ डॉ.गौरी देव या सुचवतात की, आईवडिलांनी आपल्या मुलांना मूल्ये, नैतिक पाठिंबा, समाजाशी आणि नातेवाईकांशी चांगले नातेसंबंध टिकवून ठेवणे शिकवले पाहिजे. मुलांवर बारकाईने नजर ठेवा, स्मार्टफोनचा वापर आणि मुलांचे रात्री उशिरा मोबाईलवरील संभाषण टाळा, व्हिडिओ कॉल्स, वाईट मित्र, गट यांची संगत, धूम्रपान, मद्यप्राशन, लैंगिक व्हिडिओ पाहणे, हिंसाचार आणि गुन्हेगारी टाळली पाहिजे.
१० ते १६ या वयोगटातील मुलामुलींना आपल्या लैंगिक भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला द्या, त्यांचा भर अभ्यासावर राहील, ते वेळेवर जेवून झोपतील, याची खात्री करा, मुलींनी बाहेर एकटे जाताना काळजी घेतली पाहिजे आणि सल्ल्यासाठी मानसोपचारतज्ञांशी चर्चा केली पाहिजे.