नवी दिल्ली - 'आम्ही भविष्यातील युद्धतंत्र विकसीत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सायबर, लेझर, इलेक्ट्रॉनिक, रोबोट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता सारखे तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी भारताने प्रयत्न केले पाहिजेत, असे मत लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी व्यक्त केले. ते संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या ४१ व्या 'डायरेक्टोरेट कॉन्फरन्स'मध्ये बोलत होते.
हेही वाचा- सोशल मीडियाशी 'आधार' लिंक करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयाचा याचिकेवर सुनावणीस नकार
डीआरडीओने अत्याधुनिक देशी तंत्रज्ञान विकासित केले आहेत. आम्हाला विश्वास आहे देशामध्ये बनलेल्या तंत्रज्ञानाच्या जोरावर आम्ही भविष्यातील युद्ध नक्कीच जिंकू, असे रावत म्हणाले.
गरज असले त्यानुसार विशिष्ट प्रकारचे तंत्रज्ञान विकसीत करायला हवे. आज त्याची गरज आहे. संरक्षण आणि गुप्तचर विभागाने मिळून नेमकी कोणत्या प्रकारच्या तंत्रज्ञानाची गरज आहे, याचे मुल्यांकन करायला हवे. त्यामुळे आपल्यापुढील संकटे सोडण्यासाठी आपण शत्रुच्या एकपाऊल पुढे असू, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल म्हणाले.
हेही वाचा- वायूदलाचा मोठा निर्णय, 'त्या' दोन अधिकाऱयांचे होणार कोर्ट मार्शल
तुम्ही तुमच्या शत्रुपेक्षा नेहमीच पुढे असायला हवे. आधुनिक जगात तंत्रज्ञान आणि पैसा भुराजकीय परिस्थितीवर प्रभाव पाडणार आहेत, असेही दोवाल यावेळी म्हणाले. ४१ व्या 'डायरेक्टोरेट कॉन्फरन्स कार्यक्रमासाठी तिन्ही सेनादलाचे प्रमुख तसेच डीआरडीओ प्रमुख उपस्थित आहेत.