नवी दिल्ली - नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये मागील वर्षी दहशतवादी हल्ल्यांमध्ये जीव गमावणाऱ्या जवानांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी टि्वट करून जवानांना श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी हल्ल्यांमध्ये जीव गमावणाऱ्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. जवानांनी देशाच्या संरक्षणासाठी आणि सेवेसाठी आपले जिवन समर्पीत केले. त्यांचे हौतात्म्य देश कधीच विरसरणार नाही, असे मोदींनी म्हटले आहे.