महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आता तयारी विधासभेची...! अमित शाहांची ३ राज्यांच्या कोअर कमिटीसोबत बैठक - committee

अमित शाहांना निवडणूक नियोजनातील चाणक्य म्हणून ओळखले जाते. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नियोजनात भाजपने घवघवीत यश संपादन केले होते आणि केंद्रात भाजपने पुन्हा सत्ता स्थापन केली होती.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची बैठक

By

Published : Jun 9, 2019, 5:35 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंड राज्यातील कोअर कमिटीसोबत बैठक बोलावली आहे. बैठकीत वरील राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा करण्यात आली.

एएनआय ट्वीट

अमित शाहांना निवडणूक नियोजनातील चाणक्य म्हणून ओळखले जाते. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नियोजनात भाजपने घवघवीत यश संपादन केले होते आणि केंद्रात भाजपने पुन्हा सत्ता स्थापन केली होती. लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या या बैठकीला विधानसभेच्या तयारीच्या दृष्टीने पहिले पाऊल मानले जात आहे. बैठकीत हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि भाजपचे वरिष्ठ नेते अनिल बिज यांनी उपस्थिती लावली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details