नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या मुख्यालय भवनाची पायाभरणी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय राखीव पोलीस दल हे जगातील सर्वांत धाडसी सशस्त्र बल असल्याचे शाह म्हणाले.
गृहमंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर मी केंद्रीय पोलीस सुरक्षा दलाला जवळून पाहत आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल हे जगातील सर्वांत धाडसी सशस्त्रबल आहे. २१ ऑक्टोबर १९५९ रोजी भारतीय पोलीस दलामधील सीआरपीएफ तथा केंद्रीय राखीव पोलीस दलातील १० शूर पोलीस जवानांना देशाच्या सीमेचे रक्षण करताना प्राण गमवावे लागले. अपुऱ्या साधनसामग्रीनिशी अद्ययावत शस्त्रसुविधांनी सुसज्ज असलेल्या बलाढ्य चिनी सैनिकांशी ते लढले होते. तेव्हापासून २१ ऑक्टोबर हा दिवस ‘राष्ट्रीय पोलीस शहीद दिन’ म्हणून पाळला जातो. 80 आणि 90 च्या दशकामध्ये देशामध्ये शेजारी देशांनी दहशतवाद पससरवण्याचा अपयशी प्रयत्न केला. दहशतवाद नष्ट करण्यात सीआरएफने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे, असे शाह म्हणाले.
हेही वाचा -गुजरातमध्ये मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश, 125 पेक्षा जास्त मुलांची सुटका