नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्यात आले आहे. सरकारच्या कृतीनंतर भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बीरेंद्र सिंह यांनी मोदी सरकार आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.
अमित शाह तर 'मॅन ऑफ स्टील'; भाजपच्या वरिष्ठ नेत्याची स्तुतीसुमने - jammu kashmir
सरदार पटेल हे लोह पुरुष होते, कारण त्यावेळस आपल्या देशात स्टील मिळत नव्हते. मात्र, आज आपल्या देशात स्टेनलेस स्टील मिळते. त्यामुळे अमित शहा हे 'मॅन ऑफ स्टील' आहेत, असे भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बीरेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.
असे बीरेंद्र सिंह म्हणाले, जे सत्तर वर्षात होऊ शकले नव्हते ते केवळ 70 दिवसात करण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. सरदार पटेल हे लोह पुरुष होते, कारण त्यावेळस आपल्या देशात स्टील मिळत नव्हते. मात्र, आज आपल्या देशात स्टेनलेस स्टील मिळते. त्यामुळे मी म्हणतो अमित शाह हे 'मॅन ऑफ स्टील' आहेत, असे ते म्हणाले आहेत.
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 आणि 35-अ ची तरतूद हटवण्यात आली आहे. हा निर्णय घेण्याअगोदर भाजपने मोठे तयारी केली होती. मोठ्या प्रमाणात भारतीय लष्कर जम्मू-काश्मीरमध्ये तैनात करण्यात आले होते. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खोऱ्यात अनेक निर्बंध लादण्यात आली आहेत. भाजपच्या या निर्णयावर विरोधकांनी टीका केली असून कलम 370 हटवणे असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे.