नवी दिल्ली - लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला भाजपचे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह आणि नितीश कुमार यांनी हजेरी लावली होती. पार्टीनंतर गिरिराज सिंह यांनी ट्वीटरवर नितीश कुमारांची प्रशंसा केली. यामुळे चिडलेल्या अमित शाह यांनी फोन करून गिरिराज सिंह यांना नितीश कुमारांबाबत अशाप्रकारे वक्तव्ये करू नका म्हणून बजावले आहे.
नितीश कुमारांसोबत 'इफ्तार पार्टी'चे फोटो ट्वीट केल्यामुळे अमित शाह भाजप मंत्र्यावर नाराज - अमित शाह
पार्टीनंतर गिरिराज सिंह यांनी ट्वीटरवर नितीश कुमारांची प्रशंसा केली. यामुळे चिडलेल्या अमित शाह यांनी फोन करून गिरिराज सिंह यांना नितीश कुमारांबाबत अशाप्रकारे वक्तव्ये करू नका म्हणून बजावले आहे.
बेगुसराय येथून निवडून आलेले गिरिराज सिंह यांनी इफ्तार पार्टीला जाण्यावरुन स्वकीयांना सुनावले होते. परंतु, त्यांनी स्वत: रामविलास पासवान यांच्या इफ्तार पार्टीला जाताना नितीश कुमार आणि अन्य नेत्यांसोबत ट्वीटरवर फोटो शेअर केले. यामध्ये त्यांनी लिहिले, की किती सुंदर चित्र असले असते, जेव्हा एवढ्या आवडीने नवरात्रीला फलआहाराचे आयोजन करताना फोटो काढले असते? आपल्या कर्म-धर्मामुळे आपण मागे राहुन दिखाव्यात पुढे राहतो?
गिरिराज सिंह यांच्या ट्वीटवर स्पष्टीकरण देतान नितीश कुमार म्हणाले, हे सर्व त्यांनी माध्यमात चर्चेत राहण्यासाठी केले आहे. तर, उपमुख्यमंत्री सुशील कुमार यांनी म्हटले, की नितीश कुमार इफ्तार पार्टीही करतात आणि छटपुजाही करतात.