महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राजनाथसिंह यांना टॉयलेटपर्यंत सुरक्षा.. तरी तक्रार नाही, अमित शाहांच्या वक्तव्याने लोकसभेत पिकला हशा - amit sabha on SPG security

अनेक वर्षांपासून सुरक्षा रक्षक राजनाथ सिंहांना टॉयलेटपर्यंत सोडण्यास येतात, तरी त्यांनी कधी तक्रार केली नाही, असा मिश्किल टोला अमित शाह यांनी मारला.

अमित शाह
अमित शाह

By

Published : Nov 27, 2019, 8:06 PM IST

नवी दिल्ली - एसपीजी सुरक्षा दुरुस्ती विधेयक लोकसभेत आज (बुधवारी) पास झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विधेयक लोकसभेत सादर केले होते. दरम्यान, या विधेयकावर चर्चा सुरू असताना अमित शहांनी केलेल्या वक्तव्यामुळे लोकसभेत हशा पिकला. अनेक वर्षांपासून सुरक्षा रक्षक राजनाथ सिंहांना टॉयलेटपर्यंत सोडण्यास येतात, तरी त्यांनी कधी तक्रार केली नाही, असा मिश्किल टोला अमित शाह यांनी मारला.

गांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा मागील काही दिवसांपुर्वी गृहमंत्रालयाने काढून घेतली. त्यावरही अमित शाहांनी उत्तर दिले. गांधी कुटुंबीयांनी अनेक दौरे एसपीजीला माहिती न देता केले आहेत. असे तब्बल ६०० वेळा घडले आहे. ते नक्की काय लपवत आहेत, असा सवाल अमित शाहांनी उपस्थित केला. त्यावेळी शाहांनी राजनाथ सिंह यांच्या सुरक्षेचे उदाहरण दिले. त्यामुळे सगळ्यांना हसू फुटले. गांधी परिवाराची एसपीजी सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या निर्णयाविरोधात देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आंदोलन केले. गांधी कुटुंबीयांची एसपीजी सुरक्षा व्यवस्था काढून भाजप सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाच एसपीजी सुरक्षा व्यवस्था देण्यात येते. त्यामध्ये गांधी कुटुंबीयांचाही समावेश होता.

ABOUT THE AUTHOR

...view details