तिरुवअनंतपूर - कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व उद्योगधंदे, व्यापार व्यवसाय बंद आहेत. नागरिक घरांमध्ये अडकून पडले असून हालचालींवर निर्बंध आले आहेत. यातून लग्नसमारंभ तरी कशी सुटतील. लग्नांच्या शुभमुहर्तांना लॉकडाऊनचे विघ्न आले आहे. मात्र, यावरही पर्याय काढत एका जोडप्याने ऑनलाईन लग्न केले आहे.
लग्नाला लॉकडाऊनचं विघ्न, मग ऑनलाईन उरकला शुभविवाह
नवरीमुलीचे आणि कुटुंबीयांचे १८ एप्रिलला केरळ जाण्यासाठी तिकिट देखील बुक होते. मात्र, लॉकडाऊन वाढल्याने विमानाचे तिकिट रद्द झाले. मात्र, लग्न रद्द न करण्यचा कुटुंबीयांनी निर्णय घेतला.
श्रीजीत नदिशान आणि अंजना हे दोघे वेगवेगळ्या राज्यात अडकून पडले आहेत. नवरा मुलगा केरळमधील कोट्टायम जिल्ह्यात तर नवरी उत्तप्रदेशातली लखनऊमध्ये कुटुंबीयांसह अडकली होती. त्यामुळे लग्नाचे सर्व नियोजन अडकून पडले. आणखी एक अडचण म्हणजे, पुढील दोन वर्ष शुभमुहर्त नसल्याचे पंडितजींनी सांगितले.
नवरीमुलीचे आणि कुटुंबीयांचे १८ एप्रिलला केरळ जाण्यासाठी तिकिट देखील बुक होते. मात्र, लॉकडाऊन वाढल्याने विमानाचे तिकिट रद्द झाले. मात्र, लग्न रद्द न करण्याचा कुटुंबीयांनी निर्णय घेतला. यावर पर्याय म्हणून ऑनलाईन लग्न करण्याचे ठरले. पंडीतजींच्या उपस्थितीत आज लग्न ऑनलाईन पार पडले. लॉकडाऊनमुळे कुटुंबीय आणि नातेवाईकांना लग्नापासून दुर राहीले. आता हे दाम्पत्य लॉकडाऊन संपण्याची वाट पाहत आहे. सर्वकाही सुरळीत झाल्यानंतर रिस्पशेनचा कार्यक्रम करण्यात येणार आहे.