तिरुवनंतपूरम - केरळमधील अरणमुला येथे एका कोरोनाबाधित 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. तरुणीला उपचारासाठी कोरोना केंद्रात नेताना, रुग्णवाहिका चालकाने तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
कोरोनाबाधित तरुणीवर रुग्णवाहिका चालकाकडून बलात्कार - केरळमध्ये कोरोना रुग्णावर बलात्कार
केरळमधील अरणमुला येथे एका कोरोनाबाधित असलेल्या 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.
नौफल (25) असे आरोपीचे नाव आहे. संबधित पीडित तरुणी आपल्या नातेवाइकांच्या घरी क्वारंटाइन होती. तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य कर्मचार्यांनी तरुणीला एका महिलेसोबत रुग्णवाहिकेतून पाठवले. दोघींनाही वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात येणार होते.
तरुणीसोबत असलेल्या महिलेस रुग्णालयात सोडल्यानंतर आरोपीने पीडितेला निर्जन ठिकाणी नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. नंतर त्याने तिला मध्यरात्री कोरोना केंद्रात सोडले, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी नौफलला अटक केली असून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला.