नवी दिल्ली - दक्षिण अमेरिकन देश ब्राझीलमध्ये अॅमेझॉनच्या जंगलात भीषण आग लागली आहे. जंगल जळत असल्याचे अनेक छायाचित्र व्हायरल होत आहेत. यापूर्वीही या जंगलामध्ये आग लागली होती. मात्र या वेळेस ही आग खूपच मोठ्या प्रमाणात फैलावली आहे. गेल्या 3 आठवड्यापासून ही आग धगघगत असून आगीने रौद्ररूप धारण केले आहे.
'आपल घर जळत आहे. पृथ्वीवरील एकूण ऑक्सिजनच्या 20 टक्के ऑक्सिजन निर्मिती होत असलेलं अॅमेझॉनचं जंगल गेल्या 16 दिवसांपासून जळत आहे. हे एक जागतीक संकट आहे. जी-7 परिषदेत हा मुद्दा महत्वाचा असायला हवा असं, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅनुएल मॅक्रॉन यांनी म्हटले आहे.
अॅमेझोनच्या जंगलात भीषण आग
जगातील सर्वात मोठं जंगल म्हणून अॅमेझॉन ओळखल जाते. ब्राझीलच्या अॅमेझॉन जंगलातील वणवा हे एक आंतरराष्ट्रीय संकट आहे. अॅमेझॉन जंगल पृथ्वीवरील एकूण ऑक्सिजनच्या 20 टक्के ऑक्सिजन निर्मिती करते. जंगलामध्ये आग पसरली असून गेल्या 15 दिवसांत 9 हजारहून अधिक वणवे पेटले आहेत.
जेफ बेजोस यांनी नदीच्या नावावरून आपल्या कंपनीचं नाव अॅमेझॉन ठेवले होते. ही एक सर्वात मोठी इ-कॉमर्स कंपनी आहे. त्यांनी जंगल वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली जात आहे. दरम्यान जंगल वाचवण्यासाठी ब्राझील सरकार आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडे अपील करत आहे. तर ब्राझीलमध्ये 20 ऑगस्टपासून आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.