जम्मू - अमरनाथ यात्रेकरूंचा पहिला जत्था आज रविवारी भगवतीनगर बेस कॅम्पपासून कडेकोट बंदोबस्तात रवाना झाला. या वर्षीच्या यात्रेवर दहशतवादी हल्ल्यांचे सावट असल्याने यंदा सुरक्षेची अभूतपूर्व व्यवस्था करण्यात आली आहे.
अमरनाथ यात्रेकरूंचा पहिला जत्था रवाना; सोमवारी घेतील बाबा बर्फानींचे दर्शन - Jammu and Kashmir
अमरनाथ यात्रेकरूंचा पहिला जत्था आज रविवारी भगवतीनगर बेस कॅम्पपासून कडेकोट बंदोबस्तात रवाना झाला आहे.
४६ दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी देशभरातून आतापर्यंत जवळपास दीड लाख भाविकांनी नोंदणी केली आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे सल्लागार के. के. शर्मा यांच्या उपस्थितीत अमरनाथ यात्रेसाठी भाविकांचा पहिला जत्था रवाना झाला आहे. यात्रेच्या मार्गात ठिकठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.
यात्रेसाठी रवाना झालेले भाविक संध्याकाळपर्यंत श्रीनगरला पोहोचतील आणि सोमवारी बाबा बर्फानीचे दर्शन घेतील. या ठिकाणी भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. श्रावण पूर्णिमा (रक्षा बंधन) च्या दिवशी 15 जुलैला यात्रेचा समारोप होणार आहे.