महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारतीय वायुसेनेच्या एएन-३२ अपघातग्रस्त विमानातील १३ जणांचे मृतदेह सापडले - अधिकारी

विमानात मृत झालेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मृतदेह सापडले असल्याची माहिती वायुसेनेच्या पथकाने दिली आहे. यासोबतच, अपघाताचा तपास करताना महत्वपूर्ण असलेला ब्लॅक बॉक्सही सापडला असल्याची माहिती पथकाने दिली आहे.

एएन-३२

By

Published : Jun 13, 2019, 5:36 PM IST

नवी दिल्ली - भारतीय वायुसेनेच्या अपघातग्रस्त झालेल्या आयएएफ एएन-३२ विमानाजवळ आज सकाळी शोधपथक पोहोचले होते. मात्र, त्यावेळी अपघातग्रस्त विमानाजवळ त्यांना कोणाचाही मृतदेह सापडला नव्हता. परंतु, विमानात मृत झालेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मृतदेह अपघात परिसरात सापडले असल्याची माहिती वायुसेनेच्या पथकाने दिली आहे. यासोबतच, पथकाने ब्लॅक बॉक्सही शोधून काढला आहे.

भारतीय वायुसेनेचे आयएएफ एएन-३२ हे विमान ३ जूलैला १२ वाजून ३० मिनिटाच्या सुमारास अरुणाचल प्रदेशच्या जंगलात कोसळले होते. या विमानात भारतीय वायुसेनेचे १३ अधिकारी आणि कर्मचारी प्रवास करत होते. रडारपासून या विमानाचा संपर्क तुटल्यापासून शोधमोहीम सुरू होती. तब्बल ८ दिवसांनंतर या विमानाचे अवशेष हवाई दलाच्या कॅमेऱ्यात कैद झाले. मात्र, या अवशेषांजवळ पोहोचण्यास पाऊस आणि धुक्यामुळे शोधपथकाला अडचणी येत होत्या. अखेर आज पहाटे ८ जणांचे शोधपथक अपघातग्रस्त विमानाजवळ पोहोचले. या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शोधमोहिम राबवण्यात आली होती. यावेळी या पथकाने दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळावर कोणत्याही व्यक्तीच्या मृतदेहाचे अवशेष सापडले नाहीत. परंतु, शोध केल्यानंतर पथकाला या सर्वांचे मृतदेह आढळून आले आहेत.

विमानात वायुसेनेचे विंग कमांडर जी. एम. चार्ल्स, स्कॉड्रन लीडर एच. विनोद, फ्लाईट लेफ्टनंट आर. थापा, फ्लाईट लेफ्टनंट आशिष तन्वीर, फ्लाईट लेफ्टनंट एस. मोहंती, फ्लाईट लेफ्टनंट एम. के. गर्ग या अधिकाऱ्यांसह, के. के. मिश्रा, अनुप कुमार, शेरीन, एस, के. सिंग, पंकज, पुतळी आणि राजेश कुमार. या सर्वांना भारतीय वायुसेनेने ट्वीटरवर श्रद्धांजली वाहिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details