भोपाळ- सर्व मुलांकरता शिक्षणासाठी समान व्यवस्था असावी, अशी मागणी मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनी केली आहे. सर्व दहशतवादी मदरसामध्ये वाढतात. त्यांना मदरसामधून शिक्षण मिळते, असा त्यांनी दावाही केला आहे. त्या इंदूरमध्ये माध्यमांशी बोलत होत्या.
सर्व दहशतवादी मदरसामधूनच वाढले; मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्र्यांचे वक्तव्य - Madrasas education in India
मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनी मदरसामधील शिक्षणाबाबद वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ज्या मदरसामधून राष्ट्रवादाच्या नियमांचे पालन केले जात नाही, अशा मदरसा सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत जोडल्या जाव्यात, अशी मागणीही ठाकूर यांनी केली.
धर्मावर आधारित शिक्षण हे कट्टरतावादाला खतपाणी घालते, असे उषा ठाकूर यांनी म्हटले आहे. सर्व दहशतवादी हे मदरसामध्ये वाढल्याचा दावा मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनी केला. त्यामधून जम्मू आणि काश्मीरला दहशतवाद्यांचा कारखाना झाल्याचा दावा उषा ठाकूर यांनी केला.
ज्या मदरसामधून राष्ट्रवादाच्या नियमांचे पालन केले जात नाही, अशा मदरसा सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत जोडल्या जाव्यात, अशी मागणीही ठाकूर यांनी केली. हे संपूर्ण समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.