महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मध्यप्रदेश: सामूहिक बलात्कार प्रकरणातील सातही आरोपी गजाआड

सातही आरोपींवर बलात्कार, अपहरण, जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : May 2, 2020, 10:35 AM IST

भोपाळ - राज्यातील बैतूल येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी सातही आरोपींना अटक करण्यात आले आहे. २९ एप्रिलच्या रात्री तरुणीवर बलात्कार करण्यात आला होता. आरोपींनी तरुणीच्या भावाला मारहाण करत विहिरीत फेकून दिले होते.

दुचाकीवरून भावाबरोबर घरी येत असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता, असे पोलीस अधिक्षक डी.एस. भदौरिया यांनी माहिती दिली. सुरुवातील गुन्हा दाखल केला तेव्ही मुलगी अल्पवयीन असल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, नंतर तिचे वय २० वर्ष असल्याचे समोर आले.

सातही आरोपींवर बलात्कार, अपहरण, जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगानेही लक्ष घातले असून अहवाल मागितला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details