श्रीनगर - केंद्र सरकारने कलम ३७० रद्द करून जम्मू-काश्मीर पुनर्रचनेचे विधेयक संसदेत मंजूर केले. त्यामुळे कोणताही हिंसाचार होऊ नये, यासाठी शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आले होते. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्यामुळे जम्मू खोऱ्यात असलेल्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये आज थोडी सुट देण्यात आली. कलम 144 जम्मूमधून हटवण्यात आले असून आज पुन्हा शाळा आणि महाविद्यालये सुरू झाली आहेत.
जम्मू खोऱ्यात परिस्थिती पूर्वपदावर, शाळांसह महाविद्यालये पुन्हा सुरू
जम्मू खोऱ्यात असलेल्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये आज थोडी सुट देण्यात आली आहे.
शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू
सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थान आपले सामान्य कामकाज सुरू करू शकतात, असा आदेश जम्मूच्या जिल्हा दंडाधिकारी सुषमा चव्हान यांनी जारी केला आहे.
संसदेमध्ये ३७० कलम रद्द करण्याचे विधेयक पास झाले आहे. जम्मू -काश्मीर आणि लडाख आता केंद्रशासित प्रदेश बनले आहेत. दरम्यान पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी जम्मू काश्मीरचा दौरा करुन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली आहे.