नवी दिल्ली - पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात सीआरपीफचे ४५ जवान धारातिर्थी पडले. यासंबंधी दिल्लीत आज सर्वपक्षीय बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी सर्व नेत्यांनी या प्रसंगात सरकारसोबत उभे राहण्याचे आश्वासन दिले.
संसदीय कार्यमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी बैठकीची माहिती दिली. ते म्हणाले, की बैठकीत सर्व नेत्यांमध्ये पुलवामा घटनेवर चर्चा झाली. सैनिक आणि अर्ध सैनिकांना पूर्ण मोकळीक आहे. आपल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे गृहमंत्री या बैठकीत म्हणाले. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी सरकारला या प्रसंगात मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.